चिन्ह कुठलेही असो, विधानसभा लढविणारच : प्रताप ढाकणे


वेब टीम : अहमदनगर
निवडणूक चिन्ह कुठलं असेल माहीत नाही मात्र आगामी विधानसभा निवडणूक कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढवू असा निर्धार केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी केला.
शहरातील संस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ढाकणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बन्‍सी आठरे, नगरसेवक बंडू बोरुडे ,ऋषिकेश ढाकणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गहीनाथ शिरसाठ, रंजीत बेळगे, अर्जुन धायतडक, सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे यांच्यासह पाथर्डी शेवगाव मतदार संघातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

 निर्धार मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी अॅड. ढाकणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला . तर अनेकांनी भाजपा ,शिवसेना किंवा बहुजन वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचे आव्हान केले. कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकल्यानंतर ढाकणे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यामुळे लहानपणापासून सत्ता जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे पद असो किंवा नसो याचा मला काहीही फरक पडत नाही. सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याचा माझा पिंड आहे. गेली पंचवीस वर्ष केलेल्या संघर्षात सत्ता मिळाली नसली तरी कार्यकर्त्यांची ताकद वाढत गेली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन मतदारसंघात झालेल्या तालुक्याच्या  विभागणीमुळे विकास रोखला गेला आहे. बबनराव ढाकणे यांच्याइतकेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर माझे प्रेम आहे. स्वर्गीय मुंडे मुळे मी भाजप सोडली नाही. तर पक्षात माझ्याबरोबर झालेल्या राजकारणामुळे मला भाजप सोडावे लागले.  केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर स्वर्गीय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यांनी मला भेटायला बोलावले होते. मात्र त्या अगोदरच नियतीने घात केला. आमची भेट होऊ शकली नाही. जिथे असू तिथे प्रामाणिक राहण्याची आम्हाला ढाकणे साहेबांची शिकवण आहे. राष्ट्रवादीत गेल्यानंतर गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे कार्य केले. शरद पवार शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही केले. मला मात्र दुर्देवाने पाच वर्षात राष्ट्रवादीत कुठलीही संधी मिळाली नाही. पद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही परंतु कार्यकर्त्यांना पदाच्या मार्फत अधिक ताकद देऊ शकलो असतो.


भाजपा - शिवसेना नेत्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्या संबंधांचा राजकारणाशी  कधीही संबंध येऊ दिला नाही. ज्या पक्षात गेलो तिथे प्रामाणिक काम केले. अनेक मित्रांनी आग्रह केला यावेळी तुम्ही थांबता कामा नये तुम्ही लढलं पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या निर्धार मेळाव्याचे चे आयोजन केले आहे. यावेळी ढाकणे यांनी निवडणूक लढवू का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला सर्वांनी हात उंचावून एक मुखी " लढा ''अशी गर्जना केली. उपस्थित कार्यकर्त्यांचा जोश पाहून ढाकणे म्हणाले कोणाच्या उपकारावर नाही तर तुमच्या ताकतीवर हा वाघाचा पठ्ठा निवडणुक लढवल्याशिवाय राहणार नाही. पाथर्डी शेवगाव मतदार संघ सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रदूषित झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून या मतदारसंघाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे आणि या सामाजिक स्वास्थ्याला दुरुस्त करण्यासाठी आपणच चिन्ह कुठले असेल माहित नाही  मात्र आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले या लढाईत यश मिळवायचे असेल तर सर्वांना बरोबर घ्यावे लागेल यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावात भेटी देऊन कार्यकर्त्यांचे बैठकांचे आयोजन करून विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे ढाकणे यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गीते यांनी केले तर वैभव दहिफळे यांनी आभार मानले.
 जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी निर्धार मेळाव्यात आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राज्यश्री घुले यांच्यावर सडकून टीका केली. ढाकणे म्हणाल्या, आपल्या लोकप्रतिनिधीचे सध्या मतासाठी भावनिक राजकारण सुरू आहे. वंजारी समाजाची मतासाठी फसवणूक केली जाते आहे. मताचा स्वार्थ आला की स्व .गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे आठवतात. मतासाठी बहिणीचे नाते लावले जाते . भाजपा , मुंडे , मोदी यांच्या नावाचा वापर करून आपली फसवणूक केली जाते.स्वार्थ साध्य झाल्यानंतर मात्र दुजाभाव करून जातीचे राजकारण केले जाते. मी स्वतः मराठा आहे . आमच्या घरात जातीपातीचे राजकारण कधीही केले जात नाही.
सध्या राजकारण चुकीच्या दिशेने सुरू आहे. दुजाभावाच्या राजकारणामुळे ओबीसी समाज विरोधात आहे. भावनिक राजकारण करण्याचा मलाही अधिकार आहे. स्वर्गीय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post