शिवेंद्रराजे, संग्राम आणि राहुल जगताप हे तिघेही राष्ट्रवादीसोबतच : शरद पवार


वेब टीम : पुणे
आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले, त्यांनी मला सांगितलं, पक्षाच्या चौकटीबाहेर मी नाही. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले, तेही पक्षासोबत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबत हेलिकाॅप्टरमध्ये होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे मला भेटायला येत आहे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे दोन्ही आमदार जगताप राष्ट्रवादी तच राहणार असल्याचे बोलले जाऊ लागले नाही.राष्ट्रवादीेचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्यावर भाजप दबाव टाकत आहे. अडचणीत सापडलेल्या मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढविण्यासाठी दबाव टाकत आहे, असा आरोप त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांना भाजपत यावं असं निमंत्रण दिलं, मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर ED चा छापा पडला, असा दावा त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा टोकाचा गैरवापर भाजप करत आहे. कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती कर्नाटक वेळी दिसली. यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. संसदीय लोकशाहीला मोठा आघात करण्याची वृ्त्ती दिसते, असा घणाघात त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post