अंगावर वीज कोसळल्याने मुलीचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर
शेवगाव तालुक्यातील खामगाव अंगावर वीज पडून शुभांगी राजू शिंदे (वय 14) या शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रविवारी (दि.2) दुपारी ही घटना घडली.

शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून शुभांगीच्या अंगावर कोसळली यामध्ये तिचा मृत्यू झाला. शुभांगी शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन मदत केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post