महिला आयोग महिलांचे हक्काचे माहेर घर- विजयाताई रहाटकर


वेब टीम : अहमदनगर
महिला आयोग हे राज्यातील महिलांचे दुसरे हक्काचे माहेर घर असल्याचा विश्वास आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी व्यक्त केला.

प्रज्वला योजने अंतर्गत राहुरीतील पाडुरंग लॉन्समध्ये आयोजीत महिला बचत गटांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा बचत गट कणा आहे. त्यामुळे आयोगाने प्रज्वला योजना सुरू केली आहे. असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अध्यक्षा रहाटकर व अन्य सदस्यांनी महिलांच्या हितासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रज्वला समिती सदस्या उषा वाजपेयी, उमा खापरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या वैशाली नान्नोर, तक्रार निवारण समिती सदस्या शिल्पा दुसुगे, गटविकास अधिकारी गोविद खामकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण गायकवाड यांनी तर, सुत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले. मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मेळावा यशस्वीपणे पार पाडण्याकामी सुभाष शिरसाठ, सविता प्रजापती व तालुक्यातील महिला गटांसाठी काम करणाऱ्या सर्व महिला, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. याशिवाय महिला व बाल कल्याण विभाग व पंचायत समितीच्या अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गट विकास अधिकारी गोविद खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post