अहमदनगर जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, अध्यक्ष गायकर भाजपमध्ये


वेब टीम : अहमदनगर
आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा असलेली अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आता भाजपच्या ताब्यात गेली आहे. बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

गायकर हे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक आहेत. मधुकरराव पिचड यांच्यासह आ. वैभव पिचड यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळीच गायकर यांचाही प्रवेश करून घेण्यात आला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकर यांचे स्वागत केले.

बँकेवर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे यांची सत्ता आहे. गायकर हे पूर्वी थोरात गटाचे समजले जात होते. आता भाजपात प्रवेश केल्याने हा थोरात गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post