विधानसभेसाठी मनसे, वंचितला सोबत घेणार : आ. बाळासाहेब थोरात


वेब टीम : मुंबई
मरगळलेल्या काँग्रेसला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात खांदेपालट केला आहे. शनिवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर बाळासाहेब थोरात चांगलेच अ‌ॅक्टीव झाले आहेत. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी महाआघाडीचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे, वंचित आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेणार असल्याचं त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवेसेना युतीच्या निमित्ताने लोकशाहीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं थोरात म्हणाले आहेत.
समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला ज्यांच्याशी चर्चा करण्याची गरज पडेल त्यांच्याशी चर्चा करु, असंही ते म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post