वेब टीम : दिल्ली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळ...
वेब टीम : दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात होणार आहे, त्यानंतर नव्या वेळेप्रमाणे, सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.
१५ जुलै रोजी चांद्रयान-२च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क ३ एम१ ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होणार आहे.
यापूर्वी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.
COMMENTS