IND vs NZ : भारतीय संघ पराभवाच्या छायेत


वेब टीम : मँचेस्टर
विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 240 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडच्या या आव्हानाचा सामना करतांना भारतीय फलंदाजी ढासळली आहे. 94 रणांवर 6 फलंदाज बाद झाले असून, 19 ओव्हर शिल्लक आहे.

सध्या महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा फलंदाजी करत आहेत. रिझर्व्ह डेला भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली आहे. काल 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा केवळ 23 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. या 23 चेंडूत न्यूझीलंडने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 28 धावा केल्या. आज डावाची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला लागोपाठ तीन धक्के बसले. रॉस टेलर, टॉम लॅथम यांच्यानंतर मिशेल हेन्रीही झटपट माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमारने विकेट्स घेतल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post