जलशक्ती अभियानासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल


वेब टीम : अहमदनगर
राज्यातील आठ जिल्ह्यातील २० तालुक्यात जलशक्ती अभियान राबविले जाणार असून यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि संगमनेर तालुक्यांचा समावेश आहे. याकामी नियुक्त केलेले केंद्रीय पथक आज पासून दोन दिवस त्या पाच तालुक्यात जाणार आहे. आज १० जुलै रोजी शिर्डीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पावसाचे पाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. १ जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, राहाता-शिर्डी, पिपळस, संगमनेर-तळेगाव, कोपरगाव-वेस, कासली, श्रीरामपूर-दिघी व राहुरी तालुक्यातील ताभेरे, डिग्रस व सडे या गावांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post