वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत शिवसेना-भाजप युतीची पुढील आठवड्यात चर्चा सुरू होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा होणार आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणाऱ्या आयारामांवरही चर्चा केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या मते, मित्रपक्षांना १८ जागा सोडून शिवसेना भाजप १३५-१३५ जागा लढवण्याची शक्यता आहे. सध्या ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार जिंकलेला आहे. त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला असून काही ठिकाणी उमेदवार बदलले जाणार आहेत. भाजपचे १२३ आणि शिवसेनेचे ६३ आमदार असून या जागांव्यतिरिक्त अन्य जागांवर चर्चा होईल. काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. त्यामुळे आयारामांना जागावाटप कसे करायचे यावरही चर्चा केली जाणार आहे.
पुढील आठवड्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही जागावाटपाबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Post a Comment