छत्तीसगडमध्ये चकमक ; पाच नक्षलवाद्यांचा खात्मा


वेब टीम : रायपूर
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.

यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाले.

ही चकमक नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड भागातील जंगलांत शनिवारी सकाळी झाली.यावेळी सैनिकांनी पाच नक्षलींना कंठस्नान घातले. गोळीबारा दरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

जखमी सैनिकांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या चकमकीनंतर परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post