मुळा धरणातून डावा, उजवा कालव्यासाठी पाणी सोडले


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्हाल्याला वरदान ठरलेले २६००० दश लक्ष घनफुट क्षमता असलेले मुळाधरण आज रोजी २३५०० दशलक्ष घनफुट भरल्याने पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणातुन मुळानदी पात्रातुन जायकवाडी धरणासाठी धरणाच्या अकरा दरवाज्यातुन मुळानदी पात्रात,तीन हाजार सहाशे क्युसेस धरणाच्या ऊजव्या व डाव्या कॅनल मधुन लाभ क्षेत्रातील शेतीसाठी १४०० क्युसेस मिळुन ४००० क्युसेसने राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हास्ते व अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी आभियंता आर पी मोते कृषीभुषण सुरसिंगराव पवार बारागाव नांदुर जिल्हा परिषद गटाचे सदस्य धनराज गाडे,यांच्या उपस्थितीत धरणाच्या दरवाज्याची कळ दाबुन विर्सग करणात आला.


या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना आर पी मोरे म्हणाले की मुळाधरणातुन वांबोरीपाईप चारीच्या विजबिल व देखभाल दुरुस्ति साठी शासनाकडुन ६० लख रुपये उपल्बध झाले असुन चार पाच दिवसात विदयुत पंपाच्या दुरुस्तीचे तसेच आँँईलिंगचे काम संपवुन वांबोरी पाईप चारीतुन गावतळे भरुन घेणे साठी पाणी सोडण्यात येईल.


सध्या मुळाधरण लाभ क्षेत्रात पाऊस सुरुच असुन मुळाधरणात दहा हजार चारशे क्युशेस पाण्याची आवक सुरु आहे .या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे अहमदनगर पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी आभियांत्या सायली पाटील मुळाधरण आभियंता आण्णासाहेब आंधळे कार्यकारी आभियंता सलीम शेख कर्मचारी भाऊसाहेब गुलदगड गुलाब शेख,रावसाहेब तनपुरे,उत्तमराव म्हसे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post