'बापाला शुभेच्छा देणार नाही का?' : सोशल मीडियातून पाकिस्तान ट्रोल


वेब टीम : दिल्ली
भारत आज ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. अनेक ठिकाणी झेंडावंदन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खऱ्याखुऱ्या उत्साहाबरोबरच सोशल मीडियावरही भारतीयांचा उत्साह पहायला मिळत आहे. सध्या ट्विटरवर #AbbuKoWishNahiKaroge असा हॅशटॅग देखील व्हायरल होत आहे.

पाकिस्तानला ट्रोल करत ‘बापाला शुभेच्छा नाही देणार का?’ असा खोचक सवाल भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानी नेटकऱ्यांना केला आहे. #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी मिम्स शेअर केले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० रद्द करत जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने याबद्दल संताप व्यक्त केला. पाकिस्तान लष्करातील मेजर जनरल आणि मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महासंचालक आसिफ गफूर यांनी १४ ऑगस्टच्या रात्री १० वाजता एक ट्विट केले होते.

या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणत पुढील १५० मिनिटांमध्ये तो सुरु होईल असे म्हटले होते. त्यांच्या याच ट्विटला भारतीयांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग वापरुन पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post