वेब टीम : अहमदनगर शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येवुन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्यावतीने येत्या २७ ऑगस्टप...
वेब टीम : अहमदनगर
शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येवुन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्यावतीने येत्या २७ ऑगस्टपासून शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमास शहरातील नागरिकांसह महापालिका प्रशासनाचे सहकार्य घेतले जाणार आहे. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर असलेल्या जुने बसस्थानक, स्वास्तिक बसस्थानक, तारकपूर बसस्थानक व बालिकाश्रम रस्ता याठिकाणावरुन होणार आहे. या पार्श्वभुमीवर स्वच्छता रक्षक समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि. २१) दुपारपर्यंत या चारही परिसरांची पाहणी करुन कशा पद्धतीने ती मोहिम राबविता येईल याबाबत चर्चा केली.
यावेळी समितीच्या ज्योती दिपक, किरण कालरा, प्रतिभा धुत, सुधा खंडेलवाल, शशी बिहाणी, अनु गाडेकर, माधवी दांगट आदी उपस्थित होत्या.उ स्वच्छता रक्षक समितीच्या या उपक्रमात आ.संग्राम जगताप हेही सहभागी होणार असून त्यांनीही समितीसमवेत याठिकाणांची पाहणी केली. जुन्या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.
याठिकाणी कशा पद्धतीने काम करायचे व हा परिसर यापुढे कायमस्वरुपी स्वच्छ कसा राहिल याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी एसटीचे विभागनियंत्रक विजय गिते, अभियंता कैलास काळभोर, अभियंता लक्ष्मण पाटोळे, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ.एन.एस.पैठणकर, स्वच्छता निरीक्षक आर.सी.रामदिन, आर.एल.सारसर, के.के.देशमुख, टी.एन.भांगरे तसेच माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.
COMMENTS