भंडारदऱ्यात मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी : स्थानिकांनी दिला चोप


वेब टीम : भंडारदरा
स्वातंत्र्यदिनी मद्यधुंद पर्यटकांकडून रस्त्यातच धिंगाणा सुरु होता. ही घटना एक प्रेस फोटोग्राफारच्या लक्षात येताच, ती कँमे-याने टिपण्याचा प्रयत्न केल्यावर धक्का बुकी कँमेरा हिसकविण्यात आला.

याबाबत समजलेली गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा सुमारास भंडारदरा येथे काही मद्यधुंद  पर्यटकांचा वाहतूक अडवून भर रस्त्यात धिंगाणा  सुरू होता. प्रेस फोटोग्राफर व अकोले तालुका पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख विलास तुपे यांनी  ही घटना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत असताना याचा राग आल्याने मद्यधुंद पर्यटकांनी त्यांचे कडील कॅमेरा हिसकावनेचा प्रयत्न केला.  

ही माहिती समजताच पत्रकार संजय महानोर यांनी पोलीसांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकही येथे जमा झाले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी या मद्यधुंद पर्यटकांची चांगलीच धुलाई केली.

अखेर या गर्दीतून  आपली सुटका करत या पर्यटकांनी तेथून पळ  काढला. घोटी- इगतपुरी येथील हे पर्यटक असल्याचे  सांंगण्यात येते. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी पर्यटकांचा धुमाकूळ थांबत नसल्याने या उपाय योजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  दरम्यान या घटनेचा अकोल्यात पत्रकार संघटनानी निषेध नोंदविला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post