मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या : विरोधीपक्ष नेत्यांची मागणी


वेब टीम : मुंबई
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री, तसेच पंतप्रधान म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे.

२००८ च्या जागतिक मंदीच्या रेट्यातही भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसू दिली नाही. त्याचे सर्व श्रेय डॉ. मनमोहनसिंग यांनाच जाते. 

भारताला जागतिक पातळीवर मान मिळवून दिलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांना ‘भारतरत्न’ देऊन यथोचित सन्मान करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post