तयार होत आहे ‘बुर्ज खलिफा’ हून उंच इमारत


वेब टीम : दुबई
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीचा लौकिक आहे. तब्बल 828 मीटर उंचीची ही इमारत जगभरातील पर्यटकांचे एक आकर्षण आहे. मात्र, लवकरच ही इमारत आपला किताब गमावू शकते.

पश्चिम आशियात आता यापेक्षाही अधिक उंचीच्या दोन टॉवर्सचे काम सुरू असून दोन्ही टॉवर्स पुढील वर्षापर्यंत पूर्ण होऊ शकतात. पहिला टॉवर दुबईच्याच क्रीक हार्बरमध्ये उभा केला जात आहे. त्याची उंची तब्बल 938 मीटर असणार आहे.

दुबईच्या ‘एम्मार प्रॉपर्टीज’ने या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी सुमारे 65 अब्ज रुपये खर्च येणार आहे. या इमारतीमध्ये फिरती बाग, फिरती बाल्कनी आदी अनेक वैशिष्ट्ये असणार आहेत.

दुसरीकडे सौदी अरेबियात ‘जेद्दाह टॉवर’ उभा राहत आहे. त्याची उंची दुबईत बनत असलेल्या या इमारतीपेक्षाही 72 मीटर अधिक असेल.

या इमारतीचे बांधकाम 2013 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी त्याला ‘किंगडम टॉवर’ असे नाव दिले होते. या इमारतीची उंची 3281 फूट असेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post