ईडीने ठरवले तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांची सुद्धा चौकशी होऊ शकते


वेब टीम : पुणे
अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) कोणावर कारवाई करायचीे, कोणावर नाही असे सांगता येत नाही. त्यांना पूर्णतः स्वायत्तता आहे. त्यामुळे या कारवाईपासून पळण्यासाठी अनेक राजकीय पक्षातील दिग्गज भाजपसोबत संधान बांधत असून अनेकांनी पक्ष प्रवेश करण्यास सुरवात केली आहे.

परंतु, भाजपमध्ये प्रवेश केला तरी ईडीची कारवाई होणार नाही असे नाही. ईडीने ठरवले तर कारवाई ही अटळ असल्याची स्पष्टोक्ती पुण्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, निवडणूक विभाग, ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना ज्या ठिकाणी आर्थिक अफरातफर आढळून आली त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी ते सरसावतात. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा व्यक्तीने सांगायची गरज नाही.

ईडीने चौकशी करण्याचे ठरवल्यास तत्काळ कारवाई होत नाही. त्यासाठी हा विभाग तीन ते चार वर्ष रेकी करत असतो. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास कारवाई करण्यास सुरवात करतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post