मुक्या जनावरांनी फोडला टाहो; मग झाला आत्महत्येचा उलगडा


वेब टीम : अहमदनगर
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गुणोरे म्हसे खुर्द रोड लगत असणार्‍या बढे वस्तीवर राहणारे बाबाजी विठ्ठल बढे, कविता बाबाजी बढे, आदित्य बाबाजी बढे, धनंजय बाबाजी बढे या एकाच कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बाबाजी बढे हे शेतकरी असून त्यांचा पशुपालन व्यवसाय असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे याच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत, म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती.

सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे.

 आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post