आई बाहेर गेलेली, भाऊ झोपलेला..नराधमाने घरात घुसून केला मुलीवर बलात्कार !


वेब टीम : मुंबई
अज्ञात नराधमाने घरात घुसून एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विरार परिसरात मंगळवारी (30 जुलै) रात्री 9.45 ते 10.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मुलीची आई काही कामासाठी बाहेर गेली होती तर तिचा धाकटा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपला होता.

याचा फायदा घेऊन अज्ञात नराधम घरात घुसला आणि त्याने मुलीला किचनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यानंतर मुलीने आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post