भाजप म्हणजे पापं धुण्याचा घाट : धनंजय मुंडे संतापले


वेब टीम : जालना
भाजप म्हणजे पाप धुण्याचा घाट झाला आहे. तेथे जा आणि पवित्र व्हा,अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये नसणाऱ्यांना विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आणि गुन्ह्य़ांचे आरोप करून धमकावले जाते. विरोधी पक्षातील नेत्यांवर दडपशाही करून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी  भाजपवर टिका केली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि बदनापूर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या वेळी जाहीर सभेत ते बोलत होते.

खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर आपल्या भाषणात टीका केली. पीक कर्ज वाटप करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे.

नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी वाढत असून मेगाभरतीची घोषणा पोकळ आश्वासन ठरले.

आमदार राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींची भाषणे यावेळी झाली.


काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ.शंकरराव राख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांचे सांत्वन केले.

त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावरील ईडीची कारवाई ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post