परवानगीशिवाय ‘डीजे’ लावताय? आधी हे वाचा


वेब टीम : लखनऊ
ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. परवानगी न घेता डीजे लावल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला ५ वर्षाची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड होऊ शकतो.

डीजेच्या आवाजामुळे तक्रार आल्यास त्या परिसरातील पोलीस स्टेशनमधील प्रभाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

न्यायाधीश पीकेएस बघेल आणि न्यायाधीश पंकज भाटिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सर्व धार्मिक सणांच्या आधी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी बैठक घेऊन ध्वनी प्रदूषणांसंबंध निर्णय घ्यायला हवे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये अशी शिक्षा होऊ शकते. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असेही कोर्टाने सुनावणी दरम्यान नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post