पाकिस्तानने भारतीय लष्कराची मिठाई नाकारली


वेब टीम : जयपूर
भारत-पाकिस्तान संबंधात सध्या तणावात असले तरी भारतीय सैन्याने आपली परंपरा सोडलेली नाही. आजच्या ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाई देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई स्वीकारण्यास नकार दिला.

राजस्तान सीमेवरती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना मिठाई देण्याचा प्रयत्न केला.

सणावारी सीमेवरती तैनात असणारे सैन्याचे अधिकारी परस्परांना मिठाई देऊन शुभेच्छा देतात. सीमेवर सौहार्दाचे वातावरण रहावे.नात्यातील कटुता संपुष्टात यावी हा हेतू त्यामागे असतो.

आज ईदच्या निमित्ताने भारताने परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने मिठाई नाकारुन कटुता आणखी वाढवली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates