नगरच्या माजी महापौरांसह इतरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल


वेब टीम : अहमदनगर
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह इतरांविरोधात अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून शनिवारी (१७) रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. दि.१२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता बुरुडगाव येथील पडीक रान परिसरात पीडित महिला ही बकऱ्या चरण्यासाठी गेली होती.

त्यावेळी आरोपी यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तेथे आले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबत असलेला जागेचा वाद मिटवायाचा आहे की नाही? असे म्हणून आरोपी यांनी पीडीतेला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यावर मारहाण केल्यामुळे पिडीत महिला बेशुद्ध पडली.

त्यानंतर बलात्कार केला व इतरांनी घेराव घातला. तू जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तर्क संपुर्ण कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post