दोन दिवस पुराच्या पाण्यात बुडाले असाल तरच अन्नधान्य; सरकारकडून पुरग्रस्तांची चेष्टा


वेब टीम : मुंबई
कोल्हापूर, सांगलीत पुराने थैमान घातलं असून अनेक लोक अडकले आहेत. अनेक लोक छतावर आपला जीव मुठीत घेऊन मदतीची वाट पाहत आहेत. पावसात उभा केलेला सगळा संसार डोळ्यासमोर बुडताना पाहूनही जगण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.

अशावेळी लोकांना मदत करण्याऐवजी सरकारकडून त्यांची थट्टा केल्याचं समोर आलं आहे. दोन दिवस पाण्यात बुडालं तरच अन्नधान्य मोफत दिलं जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

राज्य सरकारडून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. मात्र ही मदत करताना पूरग्रस्तांची थट्टाच जास्त करण्यात आली आहे.

दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस क्षेत्र पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (१० किलो गहू आणि १० किलो तांदूळ) दिलं जाणार आहे. तसा जीआरच राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ७ ऑगस्ट रोजी हा जीआर काढला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post