आता काश्मीरमध्येही गणेशोत्सव : मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित


वेब टीम : पुणे
पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंचतर्फे काश्मीर येथे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पी.एम.ओ व गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे.

परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काश्मीरचे राज्यपालांच्या हस्ते गणेशोत्सवाची सुरूवात होणार असल्याची माहिती शाम देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आजपर्यंत सांस्कृतिक आदान-प्रदानमध्ये काश्मीर जनतेचा सहभाग कमी होता. या उत्सवाच्या माध्यमातून वाढावा.

काश्मीर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेची देवाण-घेवाण व्हावी, काश्मीर बांधवांनाही विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले.

तसेच काश्मीर येथे गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यानंतर काश्मीरच्या जनतेला पुण्यात बोलावून इथे काश्मीर महोत्सवाचे आयोजन होणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

यावेळी राहुल कौल, उत्तम भेलके, गजानन थरकुडे, गजानन पंडित आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates