गुजरातमध्ये पाक सैनिकांची घुसखोरी?: सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर


वेब टीम : अहमदाबाद
गुजरातमधील कांडलामध्ये कच्छमार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली.

 या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी केला.पाकिस्तानमधून समुद्रमार्गे येत हे कमांडो किंवा दहशतवादी धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती मिळते.

सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी कांडला बंदरापर्यंत पोहोचले असून सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केल्याचे गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तटरक्षक, मरीन पोलीस आणि स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

गुजरातच्या समुद्रतटावर तसेच सर्वच बंदरांवरील सुरक्षेत वाढ केली.हे कमांडो किंवा दहशतवादी छोट्या होड्यांमधून कच्छच्या खाडीतून किंवा सर क्रिकमार्गे गुजरातमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुमारे ६० एसआरपी जवानांना चेकपॉइंट्सवर तैनात केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates