नगरला रविवारी राज्यस्तरीय होमिओपॅथी एक दिवशीय सेमिनार


वेब टीम : अहमदनगर
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी,मुंबई या संस्थेच्यावतीने अहमदनगर येथे माऊली सभागृहात रविवार (दि.4) सकाळी 9 ते 5 या वेळेत राज्यस्तरीय होमिओपॅथी एक दिवशीय सेमिनाराचे आयोजित केले असल्याची माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. अजित फुंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ.भूषण अनभुले, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, डॉ. जयंत शिंदे, प्राचार्य डॉ.विवेक रेगे, डॉ. झुंजार, डॉ. दिलीप पवार, डॉ. कैलास परदेशी, डॉ. जिग्नेश बोरा, डॉ. राजेंद्र वाकळे, डॉ. दादा शिंदे आदी उपस्थित होते.


 सेमिनरचे उद्घाटन वैद्यकिय शिक्षणमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानपरिषदेचे उपसभापती ना.विजय औटी, ना.राधाकृष्ण विखे पा. खा.डॉ. सुजय विखे  पा., खा. सदशिव लोंखडे,  ना.जयदत्त क्षीरसागर, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पा. आ. बाळासाहेब थोरात, आ.शिवाजी कर्डिले, होमिओपॅथी कॉलेज फेडरेशनचे तथा आ. प्रा. विक्रम काळे, आ. किशोर दराडे, आ.अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, आ.वैभव पिचड, माजीमंत्री अनिल राठोड, बबनराव पाचपुते, आ.भाऊसाहेब कांबळे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, आरोग्यदूत रामेश्वर  नाईक, डॉ. अरुण भस्मे, डॉ. प्र.शि.पवार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


  सेमिनारमध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत डॉ. सोनाली भोसले यांचे संधीवात विकार व त्यावरील होमिओपॅथी उपचार पद्धत, दुपारी 2 ते 4 यावेळेत डॉ. श्रीकांत तलारी यांचे अ‍ॅडव्हॉन्स पॅथोलॉजिकल केसेस इन होमिओपॅथि यावर मार्गदर्शन होणार असल्याचे डॉ. फुंदे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post