चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या व घरगुती उपचार


वेब टीम : मुंबई
आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते कारण त्यावर उपचार न केल्यास नंतर चेहऱ्यावर डाग पडण्याचीही शक्यता असते.

चेहऱ्यावर पिंपल्स का येतात –
पिंपल्स येण्याची कारणे :
अनेक कारणांनी चेहऱ्यावर मुरूम येत असतात.
• हार्मोन्सच्या बदलामुळे,
• केमिकल्सयुक्त सौन्दर्य प्रसाधनांचा अतिवापर,
• त्वचेतील घाम, हवेतील धूळ व वायू प्रदूषणामुळे,
• तेलकट, मसालेदार आहार आणि फास्टफूड खाण्याच्या सवयीमुळे,
• पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे,
• मानसिक ताणतणावामुळे चेहऱ्यावर मुरूम अधिक येत असतात.

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय :
चेहऱ्यावर येणारे मुरूम, पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय.

मुलतानी माती –
दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा गुलाबजल आणि चार ते पाच ड्रॉप्स लिंबूरस हे मिश्रण थोडे पाणी घालून एकत्रित करून पेस्ट तयार करावी. हा लेप पिंपल्स च्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावावा. 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

कोरपडीचा गर –
चेहऱ्यावर मुरूम असल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावावा आणि 15 मिनीटांनी चेहरा पाण्याने धुऊन घ्यावा. पिंपल्सवर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. यामुळे त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते व पिंपल्सचा त्रास कमी होतो.

लिंबाचा रस –
लिंबाचा रस काढून एका वाटीत ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा बोळा त्या रसात बुडवून मुरूम असलेल्या ठिकाणी लावावा. यामुळे पिंपल्स सुजल्याने होणारी वेदना आणि सूज कमी होते. पिंपल्समधील बॅक्टेरियाही ह्यामुळे नष्ट होतात आणि लिंबाच्या रसामुळे मुरुमाचे डागही कमी होतात.

बेकिंग सोडा –
एक चमचा बेकिंग सोडा यामध्ये थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वछ पाण्याने धुवून घ्या. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावून हलका मसाज करावा. पाच मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. एकदा चेहरा धुतल्यावर दुसऱ्यांदा थंड पाण्याने पुन्हा चेहरा धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ टॉवेलने चेहरा हळुवार पुसून घ्यावा. हा पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्याला लावू शकता.

मध –
पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी मध लावावे व 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. मधामुळे त्याठिकानच्या बॅक्टेरिया नष्ट होतात, त्वचा हायड्रेट होते आणि पिंपल्स नाहीसे होतात.

हळद –
हळदीमध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पिंपल्सच्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावरही लावावी. 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाते, बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते आणि चेहराही उजळतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post