विंग कमांडर अभिनंदन प्रमाणे तुम्हालाही करता येणार 'थेट हल्ला'


वेब टीम : दिल्ली
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा हल्ला परतवून लावतांना भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांनी शौर्याचे उदाहरण दिले होते. त्यांच्याप्रमाणेच शत्रूराष्ट्राच्या दहशतवादी स्थळांवर तुम्हालाही आता 'थेट हल्ला' करता येणार आहे. भारतीय वायुसेनेने ही संधी मोबाईल गेमच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून दिली आहे.

भारतीय वायुसेना (Indian Air Force) यांनी Threye Interactive या डेव्हलपरसोबत भागीदारी करून इंडियन एयर फोर्स ए कट अबव्ह ही मोबाइल गेम सादर केली आहे. ही गेम अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध झाली आहे. या गेममध्ये आपल्याला भारतीय वायुसेनेची विविध विमाने खास पर्याय वापरत उडवून गेममधील मिशन्स पूर्ण करता येतील!


ही गेम सध्यातरी सिंगल प्लेयर असून येत्या काळात मल्टीप्लेयर मोडसुद्धा दिला जाऊ शकतो. ऑक्टोबर २०१९ पर्यंत ही गेम पूर्ण सुविधांसह अपडेट केली जाईल. त्यावेळी मल्टीप्लेयर मोडचा समावेश होईल. काही जणांच्या माहितीनुसार यामध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकवर आधारित मिशन सुद्धा जोडण्यात येणार आहे. IAF विंग कमांडर अभिनंदन यांना गेम कॅरक्टर रूपात समाविष्ट करण्यात आल्याचं तर ट्रेलरमध्येच दिसत आहे!

गेममध्ये SU 30, M2000, Tejas, Phalcon AWACS, C17, C130, Mi 17, Mi 35 आणि ALH Dhruv ही विमाने उडवता येतील! टच आधारित कंट्रोल्सद्वारे ही विमाने नियंत्रित करता येतील. या गेमच्या सुरुवातीला गेमबद्दल माहिती देणारं टयुटोरियल पाहायला मिळेल. विमानं कशी उडवायची, युद्ध कसं करायचं यासंबंधीत कंट्रोल्सचा कसा वापर करायचा हे शिकायला मिळेल. या गेमद्वारे तरुणांमध्ये वायुसेनेबद्दल उत्साह निर्माण व्हावा असा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Indian Air Force A Cut Above डाउनलोड लिंक्स
Download IAF A Cut Above on Google Play

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post