पाकला हरवून भारत अंतिम फेरीत


वेब टीम : दिल्ली
भारताच्या 23 वर्षाखालील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.

यासह भारताने 23 वर्षाखालील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावल्यावर पाकिस्तानला 21-25, 25-16, 25-22, 25-18 अशी मात दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तानची ही पहिलीच लढत होती.

तिसर्‍या सेटमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानकडे 21-20 अशी आघाडी होती, परंतु त्यांचे तीन फटके बाहेर गेले आणि भारताने 25-22 अशी बाजी मारली. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पिछाडीवरून मात दिली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates