आरएसएसने आरक्षणविरोधी भूमिका बदलावी : मायावती


वेब टीम : लखनऊ
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याने बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

आरक्षण हे मानवतावादी संविधानिक व्यवस्था आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली आरक्षणविरोधी मानसिकता सोडावी,असे मायावती यांनी म्हटले.

भागवत यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.जे आरक्षण समर्थक आहे किंवा आरक्षणविरोधी आहेत, अशा दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये वातावरणात चर्चा करायला हवी.आरक्षणाची चर्चा करायची म्हटले तरी वाद निर्माण होतो, असे भागवत म्हणाले होते.

भागवत यांच्या या वक्तव्यावर मायावती यांनी जोरदार टीका केली. मायावती यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्ती केली.आरएसएसचे मत आहे की, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी आरक्षणावर खुलेपणाने चर्चा करायला हवी.

जाणिवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करणे धोकादायक आहे. अशा गोष्टीची काहीही गरज नाही. आरक्षण हे मानवतावादी संविधानिक व्यवस्था आहे. संघाने आपली आरक्षण विरोधी मानसिकता सोडून द्यायला हवी, असे मायावती यांनी ट्विटरवरून म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post