डर के आगे जित... चक्क पोलीस ठाण्यासमोरूनच मोटारसायकलची चोरी


वेब टीम : अहमदनगर
शहरासह उपनगरात वाहन चोरीच्या घटनात वाढ झाली असून, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरांचे धाडस वाढले असून चोरांनी चक्क पोलीस ठाण्यासमोरून हिरो कंपनीची मोटारसायकल चोरून नेली. हि घटना तोफखाना पोलीस ठाण्यासमोर बुधवारी (दि. 21) घडली.

याबाबतची माहिती अशी कि नामदेव पुंडलिक सोनवणे (रा.घर नं.3, तोफखाना पोलीस ठाण्यासमोर, टीव्ही सेंटर रोड अ.नगर) यांनी त्यांची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र.एमएच 16, बी डब्ल्यू 6258) घरासमोर लावली होती. सकाळी साडेसात वाजता सोनावणे हे दूध घेवून आले असता त्यांना घरासमोर मोटारसायकल दिसली नाही.

त्यांनी त्यांचे मित्र वैभव म्हस्के व शिवाजी खजिनदार यांच्या मदतीने मोटारसायकलची शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. 24 तास सुरु असलेल्या पोलीस ठाण्यासमोरून मोटारसायकल चोरीस जाते, याबाबत चोरांचे धाडस म्हणावे कि पोलिसाचे दुर्लक्ष, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भादविक 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हे.कॉ. वसंत सोनावणे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post