नगरला जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या बदलीसाठी रास्ता रोको


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करण्यासाठी शहरातील सक्कर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे या  यापूर्वी मंत्रालयात मंत्री तावडे यांच्या ‘ओएसडी’ होत्या.  नियमाप्रमाणे काम सुरू केल्यानंतर अनेक क्रीडा संघटना व राजकीय नेतेमंडळी दुखावली गेली.

संघटनांनी नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या नावंदे यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले. त्यांचे शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. आता त्यांच्या बदलीचा इशाराही दिला आहे.

यासाठी 17 ऑगस्ट रोजी रास्तारोको करण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही नावंदे यांच्या विरोधात आहेत. नियमाप्रमाणे काम करणाऱ्या नावंदे या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळींना अवघड वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी प्रशासनावर दबाव येऊ लागला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post