पीएफच्या योजनेत होणार मोठे बदल

Photo : record.com

वेब टीम : दिल्ली
चालक , नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही लवकरच भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने वंचित घटकांना भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत सामावून घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.

सध्या मासिक किमान १५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.

पीएफची योजना राबवण्यासाठी आस्थापनांच्या मालकांना सध्याच्या नियमानुसार किमान २० कर्मचारी असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक किमान १५ हजार रुपये पगार असणे आवश्यक आहे.

परिणामी, १५ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात. एका खासगी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत पीएफपासून वंचित राहणाऱ्यांनाही लाभ घेता यावा यासाठी लवकरच संबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल होणार आहेत.

यासाठी कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी निर्वाह निधी कायद्यामध्ये आवश्यक बदल होणार आहेत. ईपीएफ अँड एमपी ऍक्ट १९५२ या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे एक मसुदा जाहीर केला आहे.या मसुद्यावर संबंधित घटकांकडून २२ सप्टेंबरपर्यंत सूचना व आक्षेप मागवले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post