पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची आता वेळ


वेब टीम : दिल्ली
कलम 370 रद्द करणे ही तर सुरुवात आहे. याबद्दल पाकिस्तानशी बोलणी करण्याचे कारणच नाही.

आता पाकशी जे काही बोलायचे, ते पाकव्याप्त काश्मीरबद्दलच. भारताच्या या भूभागावर पाकचा अनधिकृत ताबा आहे, तो त्यांनी काढून घ्यायला हवा.

 आता पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र करून त्याच्या भारतातील विलीनीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे, असे मत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. संसदही त्यासाठी संपूर्णपणे तयार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

विद्यमान राजकीय परिस्थितीबद्दल विचारविमर्ष करण्यासाठी जम्मूतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलताना सिंह म्हणाले की, आम्ही भाग्यशाली आहोत. कारण आम्ही काश्मीरमधील कलम 370 रद्द होताना पाहिले.


माझी परमेश्वराला प्रार्थना आहे की, याच आयुष्यात पाकव्याप्त काश्मीरही भारतात विलीन झालेला बघायला मिळावा. पाकिस्तानने आमच्या या भागावर बेकायदा पद्धतीने ताबा घेतलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post