मौल्यवान मित्र गमावला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली


वेब टीम : दिल्ली
माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांचे प्रदीर्घ आजाराने आज दुपारी बाराच्या सुमारास निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात ते ९ ऑगस्टपासून ते उपचार घेत होते.बऱ्याच दिवसांपासून त्यांना किडनीचा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने ते कृत्रिम श्वासोच्छश्वासावर होते आज अखेर त्यांची एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

जेटली यांची २०१८ मध्ये अमेरिकेत जाऊन किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर ते भारतात परतले होते. रुग्णालयात नऊ ऑगस्ट रोजी दाखल केल्यानंतर एम्सकडून फक्त एकदाच त्यांच्या प्रकृती बाबत माहिती दिली होती.

त्यानंतर भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी रूग्णालयात त्यांची भेट घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीची देखभाल करत होती. जेटली यांच्या निधनाने भाजपमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

जेटलींनी लोकप्रियता आणि कार्यकुशलता आणि सर्व विषयांतील असलेले सखोल ज्ञान यामुळे ते राजकारणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे वेगळे नाते निर्माण झाले होते. आज त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील नामवंतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मी एक मौल्यवान मित्र गमावला. मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला असंही मोदी यांनी म्हटलं आहे. अरुण जेटली यांची पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याशी मी फोनवरुन चर्चा केली. तुमच्या दुःखात सहभागी आहे असे सांगत मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असेही मोदी यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही दौरा रद्द करु नका असे त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला सांगितले असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post