वाद पेटणार ; राधाकृष्ण विखेंना व्हायचंय अहमदनगरचे पालकमंत्री


वेब टीम : नाशिक
काॅग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल होत मंत्रीपदी विराजमान झालेल्या डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज विभागीय महसूल कार्यालयात शासकीय झेंडावदन झाले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "पालकमंत्री नेमणूक करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मला नाशिक अथवा नगर यातील कुठलीही जबाबदारी दिल्यास मी ती चांगल्या प्रकारे पार पाडून दाखवीन."

नगर जिल्ह्यात विद्यमान पालकमंत्री राम शिंदे व विखे यांच्यात पटत नसल्याची चर्चा आहे. शिंदे यांना अडचणीत आणण्याची संधी विखे सोडत नाहीत. परंतु पालकमंत्री शिंदे असल्याने विखेंना अडचण होत आहे. त्यामुळेच पालकमंत्री बदलण्यासाठी विखेंनी मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग लावल्याचे समजते. त्यातच आज विखेंनी स्वतःची पालकमंत्री व्हायची इच्छा जाहीर व्यक्त केल्याने आगामी काळात नगर जिल्ह्यात विखे - शिंदे संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ते म्हणाले, " पुरामुळं राज्यात मोठं नुकसान झाले आहे. शेती, पशुधन यांचं सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. याबाबत सरकार चांगले काम करीत आहे. यासंदर्भात सगळूयांनी धीर धरावा.  आरोप करणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे. मी देखील विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे मला हे माहित आहे.  मात्र, यात राजकारण करू नये."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post