कलम ३७० चा निर्णय झोंबला; पाकिस्तानकडून दोन रेल्वेगाड्या बंद


वेब टीम : लाहोर
कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागल्याची प्रचिती येऊ लागली आहे. मिळेल त्या मार्गाने पाकिस्तान भारताविरोधातील रोष व्यक्त करत असून समझौता एक्स्प्रेस पाठोपाठ जोधपूर-कराची धावणारी थार एक्स्प्रेस ही गाडी बंद केली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी रेल्वे बंद करत असल्याची घोषणा शुक्रवारी केली.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मोदी सरकारने हटवले. तसेच काश्मीर खोऱ्याचे विभाजन करण्याचा प्रस्तावही मंगळवारी संसदेत मंजूर करण्यात आला. भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला धक्का बसला आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय एकतर्फी आणि अवैध असल्याचा आरोप पाकिस्तानकडून सातत्याने केला जात आहे.

याचा विरोध करण्यासाठी पाकिस्तानने दोन्ही देशातील व्यापार बंद केला. तसेच भारतासोबतचे राजनैतिक संबंधही तोडले आहे. विशेष म्हणजे भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांनाही परत पाठवले आहे. तसेच पाकिस्तान-भारतादरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस थांबवली होती.

त्यानंतरही पाकिस्तानच्या उठाठेवी सुरूच आहेत. काश्मीर मुद्यावर चीनने सहकार्य करावे म्हणून शुक्रवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी चीनच्या शुक्रवारी चीनला गेले आहेत. त्यातच सायंकाळी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी जोधपूर-कराची धावणारी थार एक्स्प्रेस रेल्वेसेवा बंद करत असल्याची घोषणा केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post