भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस


वेब टीम : अहमदनगर
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे भंडारदरा पाणलोट, अकोेलेचा काही भाग तसेच नगर एमआयडीसी परिसरात काल गुरूवारी जोरदार पुनरागमन झाले. त्यामुळे करपून जाऊ लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

भंडारदरा पाणलोटात रात्री 8 वाजल्यापासून रिमझीम पावसास सुरूवात झाली. त्यानंतर 8.15 वाजता पावसाने जोर धरला. रात्री 9.30 वाजेपर्यंत भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता.

त्यामुळे ओढे-नाले सक्रिय झाले. भातखाचरांमध्येही पाणी साचले होते. 9.30 वाजेनंतर पावसाचा जोर ओसरला होता. अधूनमधून सरी कोसळतच होत्या.

नेवासा तालुक्यातील जायकवाडी बँकवॉटर परिसरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसास सुरूवात झाली होती. सोनई वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार सोनई परिसरात रात्री 9.30 ते 10. 30 वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे बाजरी आणि सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे.

शनि शिंगणापूर वार्ताहराचे कळविले की, परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला.
शेवगाव तालुक्यातील आखतवाडे, मठाचीवाडी, रांजणी दहिगाव परिसरात तुरळक हजेरी लावली. नगर शहरातील नागापूर एमआयडीसी परिसरात रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दहा पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही अधूनमधून सरी कोसळत होत्या.


महिनाभरापासून येणारा दिवस पावसाविना जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पण आत पाऊस पडता झाल्याने हायसे वाटत असलेतरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post