नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप - पालकमंत्री शिंदे


वेब टीम : अहमदनगर
राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो.

यामुळे विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी  बोलतांना सांगितले.

यावेळी खा.सुजय विखे पा., माजी खा.दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे,आ.शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात दि.२५ व २६ आँगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनदेश यात्रा येत आहे. दि.२५ला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन ना.राधाकृष्ण विखे पा.यांंची सांत्वन भेट घेणा आहेत.

यानंतर अकोल्यात दु.२ वा.रवाना होऊन तेथे महाजनदेश सभा होईल. ३ वा.संगमनेर येथे मालपाणी लाँनमध्ये सभा, राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एम आय डिसी येथे भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत.

शहरातून रँली काढण्यात येऊन यानंतर सांयकाळी ७ वा.गांधी मैदानात त्यांची सभा होईल. दि.२५ ला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगहावर मुक्कामाला थांबणार आहेत. दि.२६ ला ते महाजनदेश यात्रा पाथर्डी कडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे ११.३० वा. सभा होईल.

तत्पूर्वी भिंगार, करंजी, तिसगाव येथे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टी ला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post