अयोध्या वादावर तोडगा काढण्यात मध्यस्थी समिती अपयशी; न्यायालयच घेणार निर्णय


वेब टीम : दिल्ली
अत्यंत संवेदनशील असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीला अपयश आले आहे. त्यामुळे आज (ता.२) सर्वोच्च न्यायालय पुढील दिशा ठरविण्यासाठी  निर्णय देण्याची शक्यता आहे.
अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या  मध्यस्थी समितीने काल (ता.२) बंद लिफाफ्यामध्ये आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अहवालामध्ये या वादावर सन्मानजनक तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. मध्यस्थी समितीने दिलेल्या या निर्णयामुळे न्यायालयाबाहेर तडजोड होण्याची शक्यता मावळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आता या प्रकरणी आता निर्णय घेण्याची शक्यता आहे. घटनापीठ कदाचित नियमित सुनावणीसाठी निर्णय देऊ शकते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० ऑगस्ट २०१० मध्ये वादग्रस्त जमिनीचे तीन विभाग करून अनुक्रमे रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ  बोर्डाला देण्यात यावी असा आदेश दिला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post