सांगलीत महापुराचा फटका; नदीपात्राची रुंदी वाढली


वेब टीम : सांगली
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराच्या हाहाकाराने मनुष्यांबरोबरच पर्यावरणाचीही अपरिमित हानी झाली आहे.

 कृष्णा, वारणा नदीकाठाचा भाग महापुराच्या पाण्याने खचल्यामुळे नदीपात्र मोठ्या प्रमाणात रूंदावलेले दिसून येत आहे.

महापुराच्या तडाख्याने अनेकांची घरे तसेच पिकेही पाण्यात बुडाली, मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्यूमुखी पडली व प्रचंड नुकसान झाले. 

त्याचबरोबर या महापुराच्या जोरदार प्रवाहाने पर्यावरणाचीही मोठी हानी झाली आहे. कृष्णा नदीकाठावरील असलेल्या आमणापूर (ता.पलूस) येथे तर नदीकाठचे मोठे वृक्ष नदीपात्रात आले आहेत व पात्र रूंदावले आहे. 

तसेच हरिपूर, सांगलीवाडी तसेच सांगलीच्या बायपास पूला नजीकची शेती महापुराने मोठ्या प्रमाणात खचल्याने शेतकर्‍यांपुढे आता जमीन वाचवण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. 

नदीकाठी मातीचे उत्खननही मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे नदीकाठ कमकुवत झाल्याने माती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post