आता पाकव्याप्त काश्मीर परत घेतला पाहिजे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू


वेब टीम : विशाखापट्टणम
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील पाकिस्तानला खडे बोल सुनावले असून पाकिस्तानसोबत आता फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीरवरच चर्चा झाली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले.

आपण पाकव्याप्त काश्मीरदेखील परत घेतला पाहिजे असे सांगताना काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले. ते विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

“पाकिस्तानसोबत फक्त एका विषयावर चर्चा केली जाऊ शकते तो म्हणजे पाकिस्ताव्याप्त काश्मीर. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आम्हाला युद्ध नको आहे. आम्ही शांतताप्रिय नागरिक आहोत”, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

याआधी राजनाथ सिंह यांनीदेखील पाकिस्तानसोबत फक्त पाकिस्ताव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल असे म्हटले होते. राजनाथ सिंह यांनी हयाणातील पंचकुला येथे बोलताना पाकिस्तानाला इशारा दिला होता.“काही दिवस अगोदरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे असे सांगितले.

याचा अर्थ पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हे मान्य केले आहे की, भारताने बालाकोटमध्ये काय केले.आता पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाकव्याप्त काश्मीर (पीओके) वर होईल. शिवाय जर गरज पडलीच तर बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो”, असा इशारा राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post