वाहतुकीचे नियम न पाळल्यास आता होणार दहापट दंड


वेब टीम : दिल्ली
बहुप्रतिक्षित मोटन वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर करण्यात आले. काल (ता. ३१) राज्यसभेत दुरुस्ती विधेयकावर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर १३ विरूद्ध १०८ अशा मतांनी मंजूर करण्यात आले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत विधेयक मांडले. वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट दंड होणार आहे.
या विधेयकान्वये ३० वर्षापूर्वीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच वाहतूक शिस्तीसाठी या विधेयकामध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.

त्यामुळे अनेक तरतूदी करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी राज्यसभेत चर्चा करताना सांगितले.


नव्या विधेयकानुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, विना परवाना वाहतूक, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, दारु पिऊन गाडी चालवणे, निश्चित वेगापेक्षा अधिक वेगाना गाडी चालवणे, आणि निश्चित सीमेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणे अशा अनेक गोष्टींसाठी कायद्यात शिक्षेची/दंडाची तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कायद्यात रुग्णवाहिकांना आपातकालीन स्थितीत पुढे जाण्यासाठी जागा न दिल्यास दंड होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post