ठरले, युती नाहीच! : ना. राधाकृष्ण विखेंनी दिला 'हा' सूचक इशारा


वेब टीम : अहमदनगर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजानादेश यात्रा दि.२४ व २५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शहर भाजपाच्या वतीने गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराजील्हाध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या नियोजनाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

दि.२५ रोजी सायंकाळी नगर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यावर जाहीर सभा होणार आहे. या बैठकीत सभेच्या ठिकाणाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

प्रारंभी शहर भाजपच्या बैठकीत प्रथमच उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांचा शहराजील्हध्यक्ष दिलीप गांधी व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, माजी नगरध्यक्ष अभय आगरकर, जेष्ठ नेते सुनील रामदासी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, नितीन शेलार, शाम पिंपळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलतांना मंत्री विखे म्हणले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विकास कामांचा झपाटा राज्यात चालवला आहे त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. सर्व योजना थेट जनतेपर्यंत जात असल्याने प्रभावी अमलबजावणी झाली आहे. या विकास कामांचे यश घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी महाजानादेश यात्रा सुरु केली आहे.

अबकी बार २२० पार अशी घोषणा केली आहे. हे यश भाजप मिळवणारच. यात आपला नगर जिल्हा पूर्ण सहभागी असणार असून जिल्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार हे नक्की. ही महाजानादेश यात्रा  दोन दिवस नगर जिल्ह्यात आहे. या महत्वाच्या दौऱ्याचे उत्कृष्ठ नियोजन करत आहोत. जिल्ह्यात होणाऱ्या सर्व सर्व सभा भव्यच  होणार आहे. नगर शहरातही सायंकाळी सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकी वेळी शहरात विराट सभा झाली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेचे नियोजन करत आहे. पालकमंत्री राम शिंदे, मी व दिलीप गांधी यासाठी नियोजन करत आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची  पायाभरणी या महाजानादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे.

दिलीप गांधी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात  भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. आता पुढील काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षात केलेल्या विकासाकामंचा लेखा जोखा मांडण्यासाठी ही महाजादेश यात्रा संपूर्ण राज्यात जात आहे. नगर मध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत होणार आहे. सभा स्थळा बद्दल दोन्ही मंत्री महोद्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेवू.

या यात्रेच्या नियोजना बरोबरच सांगली व कोल्हापूर येथील पुरात आपल्या हजारो बंधूंचे संसार उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना तातडीने मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेच. त्याच बरोबर भाजपच्या वतीने मदतनिधी व साहित्य गोळा करण्याची मोहीम सुरु झाली आहे.

भाजपच्या प्रत्तेक पदाधिकारी व कार्यकर्त्याचे पूरग्रस्तांना मदत करण्याचे कर्त्यव्य आहे. या मदत कार्यात सर्वांनी उत्फूर्त सहभगी व्हावे.

सुरवातीला जेष्ठ नेते सुनील रामदासी यांनी प्रास्ताविक केले. गौतम दिक्षित यांनी सूत्रसंचालन केले. सुवेंद्र गांधी यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates