विजेच्या धक्क्याने माजी सैनिकाचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर
शेतीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेकऱ्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे ही घटना साडेचारच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर असे की पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी शिवाजी काशीबा वाढवणे, वय अंदाजे ४२ हे घराशेजारील असणाऱ्या विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी शेतीपंप सुरू करण्यासाठी गेले होते. पंप सुरू करत असताना जोराचा विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 शिवाजी वाढवणे हे सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर शेती करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनस्तरावरून या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post