--> बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडा : निवडणूक आयोग | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडा : निवडणूक आयोग

वेब टीम : दिल्ली मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडावं अशी मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. आयोगानं विधी व न्याय मंत्रालयाला पत्र लिहून ही ...


वेब टीम : दिल्ली
मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडावं अशी मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. आयोगानं विधी व न्याय मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 मध्ये सुधारणा करण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. निवडणूक ओळखपत्र मतदारांच्या आधार कार्डाशी जोडल्यास बोगस मतदानासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल, असं आयोगाचं म्हणणं आहे.

’एक व्यक्ती एक मत’ योग्य प्रकारे राबवायचं असेल तर निवडणूक ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक करावं अशी निवडणूक आयोगाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आधी आयोगाने आधार आणि निवडणूक ओळखपत्र लिंक असणं वैकल्पिक असल्याचं म्हटलं होतं. मात्र माजी निवडणूक आयुक्त ए. के. जोटी यांनी 2016 मध्ये आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणूक पॅनेलनं त्यांची भूमिका बदलली. आतापर्यंत 32 कोटी आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राशी लिंक झाले आहेत.

फेब्रुवारी 2015 मध्ये पोल पॅनलने आधार कार्ड- निवडणूक ओळखपत्र लिंक करण्याविषयी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. हा राष्ट्रीय मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाचा भाग होता.

मात्र ऑगस्ट 2015 मध्ये एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा हा प्रयत्न थांबवला. सार्वजनिक विकास योजनांचे लाभ आणि अन्य धान्य पुरवठा किंवा गॅस सबसिडी वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी आधार कार्डाचा वापर करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. नंतर जुलै 2017 मध्ये, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी मतदारांचे आधार तपशील मिळण्याची मागणी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका अर्जाद्वारे केली.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडा : निवडणूक आयोग
बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडा : निवडणूक आयोग
https://1.bp.blogspot.com/-0gPgeVBWWTc/XVbRUw84SrI/AAAAAAAAD8I/WxhrllafKWEKPUxWAFKhQkZvQUEVDO0gACLcBGAs/s1600/21-22-35-download-1-33.jpg
https://1.bp.blogspot.com/-0gPgeVBWWTc/XVbRUw84SrI/AAAAAAAAD8I/WxhrllafKWEKPUxWAFKhQkZvQUEVDO0gACLcBGAs/s72-c/21-22-35-download-1-33.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/08/Voting-aadhar-card-link.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/08/Voting-aadhar-card-link.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content