ह्युंदाईने बाजारात आणली सौरऊर्जेवर चालणारी कार


वेब टीम : दिल्ली
ह्युंदाई कंपनीने आतापर्यंत सात पेक्षा जास्त हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. आता कंपनीने आणखी एक पाऊल पुढे ठेवत सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाडीची निर्मिती केली आहे. ह्युंदाई सोनाटा या हायब्रिड गाडीच्या छतावर एक सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहे. या सौरऊर्जा पॅनलमुळे बॅटरी दररोज ६ तास चार्ज झाल्यास ही गाडी वर्षभरात १,३०० कि.मी.चे अतिरिक्त मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

सोनाटा हायब्रिड गाडी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार नसून, सौरऊर्जा पॅनलच्या मदतीने गाडीमधील बॅटरी चार्ज होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीमध्ये लावलेल्या सौरऊर्जा पॅनलमुळे यामधील बॅटरी एका दिवसात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. पहिल्यांदाच सौरऊर्जा पॅनल वापवरून तयार केलेल्या सोनाटा हायब्रिड प्रकारातील गाडीमुळे मोठ्या प्रमाणात गणिते बदलणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

गाडीच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसवल्याने एक नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे येत्या काळात गाडी चालविण्यासाठी पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाची गरज भासणार नसल्याचे कंपनीने नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post