6000 mAh च्या बॅटरीसह एसुस ROG Phone 2 भारतात सादर : पॉवरफुल गेमिंग फोन


वेब टीम : दिल्ली
गेमिंग फोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन अलीकडे एसुस, रेझर, शायोमी यांनी गेमिंग फोन्स सादर केले आहेत. यामध्येच काही महिन्यांपूर्वी सादर झालेला एसुस ROG Phone 2 आज भारतात सादर झाला आहे.

यामध्ये 6.59″ 120Hz HDR डिस्प्ले आहे. असा डिस्प्ले देणारा हा पहिलाच फोन आहे. आपण नेहमी वापरतो त्या फोन्समध्ये 60Hz डिस्प्ले असतो. शिवाय ROG Phone 2 मध्ये 12GB रॅम, 1TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज, 6000mAh ची बॅटरी जी फास्ट चार्ज करता येते!

गेमिंगसाठी लागणारी किंवा गेमिंगचा पुरेपूर अनुभव देणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल! पॉवरफुल प्रोसेसर, भरपूर रॅम, फोन गरम होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या विविध सुविधा यामुळे हा फोन नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय!

AeroActive Cooler II द्वारे गेमिंगवेळी फोन अधिकाधिक थंड ठेवण्यास मदत होते. चार्जिंगसाठी याला फोनच्या बाजूलासुद्धा पोर्ट्स आहेत ज्यामुळे गेमिंग दरम्यान चार्जिंग केबलची अडचण होत नाही. यासोबत एक्सटर्नल डिस्प्ले, हेडफोन, गेमिंग कंट्रोलर अशी वेगवेगळी उपकरणे सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत.

या फोनच्या मागे असणारा ROG लोगो हा एसुस Aura Sync आधारित असल्यामुळे याचे RGB रंग पूर्णपणे नियंत्रित करता येतात! शिवाय कॉल्स, मेसेज नोटिफिकेशनसाठी यांचा वापर करता येतो!

ऑडिओसाठीसुद्धा बरंच तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून DTS Sound, Dual Amplifiers, 7.1 Surround Sound, Quad Mics चा वापर केलेला आहे!


Asus ROG Phone 2 Specs
डिस्प्ले : 6.59-inch 2340×1080 120Hz/1ms AMOLED 10-bit HDR display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855 Plus 2.96GHz
GPU : Adreno 640
रॅम : Up to LPDDR4X 12GB RAM
स्टोरेज : Up to 512GB UFS 3.0
कॅमेरा : 48MP Sony IMX586 F1.79 aperture + 13MP 125° ultrawide camera
फ्रंट कॅमेरा : 24MP F2.0
बॅटरी : 6000mAh high capacity battery, supports Quick Charge 4.0 and PD Charging 30W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Pie with new ROG UI
सेन्सर्स : In-display fingerprint, Face recognition, Accelerator, E-Compass, Gyroscope, Proximity sensor, Hall sensor, Ambient light sensor, Ultrasonic sensors for AirTrigger II and grip press, Dual vibrators.
इतर : Dual front-facing speakers with DTS:X Ultra, Bluetooth 5.0, USB Type-C, Aura RGB lighting support, Gorilla Glass 6
रंग : Matte Black, Black Glare
किंमत : ३० सप्टेंबर सकाळी ११ पासून फ्लिपकार्टवर सेलद्वारे उपलब्ध
₹३७९९९ (8GB+128GB)
₹५९९९९ (12GB+512GB)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post